एक प्रभाग रचनेनुसारच कळवणला बिगुल वाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST2021-09-24T04:16:01+5:302021-09-24T04:16:01+5:30

कळवण नगरपंचायतमध्ये १७ प्रभाग असून एका मतदाराला एक मत देण्याचा अधिकार असणार आहे. नगरपंचायतच्या पहिल्या कार्यकारिणीचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर ...

According to the structure of a ward, the trumpet will sound | एक प्रभाग रचनेनुसारच कळवणला बिगुल वाजणार

एक प्रभाग रचनेनुसारच कळवणला बिगुल वाजणार

कळवण नगरपंचायतमध्ये १७ प्रभाग असून एका मतदाराला एक मत देण्याचा अधिकार असणार आहे. नगरपंचायतच्या पहिल्या कार्यकारिणीचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर २०२० रोजी संपुष्टात आला. कोरोना संसर्गामुळे निवडणूक घेता आली नाही. परिणामी राज्य सरकारने तहसीलदार बी. ए. कापसे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नगरपंचायत प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता, सदस्यपदांच्या आरक्षणाच्या सोडत, प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे व आरक्षणाची अधिसूचना आदी कार्यक्रम प्रक्रिया पूर्ण केली आहे. मतदार याद्या प्रकाशित करुन हरकती सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर पुन्हा कोरोनाचा कहर वाढल्याने प्रक्रिया थांबवल्यामुळे आजअखेर निवडणूक प्रक्रिया ‘जैसे थे’ आहे. कळवण नगरपंचायतीत १७ प्रभागातून १७ नगरसेवक निवडून द्यायचे असून दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग सोडतही विद्यमान पदाधिकारी व नगरसेवक, नगरसेविका यांना ‘कही खुशी कही गम’ अशी ठरली असून विद्यमान ६ जणांना पुन्हा त्याच प्रभागात नशीब आजमाविण्याची संधी आहे. तर, ११ विद्यमानांना अन्य प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यात काहींचा पत्ता कट झाला असल्यामुळे अन्य उमेदवारांचे त्यांना समर्थन करावे लागणार आहे.

Web Title: According to the structure of a ward, the trumpet will sound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.