नाशिक : शहरातील मध्यवर्ती चौकांमध्ये अनेकदा विविध कार्यक्रमांचे फलक लावले जातात. परंतु कित्येकदा या फलांमुळे चौकातून डाव्याबाजूने येणारे वाहन दिसत नसल्यामुळे अपघाताचे प्रकार घडत आहेत. विशेषत: त्र्यंबक सिग्नल, आयनॉक्स सिनेमा, दिंडोरीरोडवरील मेरी चौक आदी ठिकाणी मोठमोठे फलक लावले जातात. निदान सिग्नल चौकात फलक लावण्यास मज्जाव करावा, अशी मागणी होत आहे.
चौकातील फलकांमुळे अपघातांचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:49 IST