लासलगाव येथील युवकाचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 17:14 IST2018-12-01T17:13:34+5:302018-12-01T17:14:10+5:30
लासलगांव : लासलगाव विंचूर रस्त्यावरील चामुंडा स्टील समोर झालेल्या अपघातात लासलगाव येथील युवक अजय सुनील शेरेकर (२५) यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

अजय शेरेकर
लासलगांव : लासलगाव विंचूर रस्त्यावरील चामुंडा स्टील समोर झालेल्या अपघातात लासलगाव येथील युवक अजय सुनील शेरेकर (२५) यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की अजय सुनील शेरेकर हे गुरुवारी सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकीने विंचूरहुन लासलगावकडे येत असताना समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना नाशिक येथील जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा पहाटे मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दीड महिन्याचा मुलगा, भाऊ असा परिवार आहे. याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.