शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडच्या चौघा युवकांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 01:59 IST

इंदूर- पुणे राज्य महामार्गावरील मनमाडजवळ अनकवाडे शिवारात शेजवळ पॉलिटेक्निक कॉलेजजवळ बुधवारी मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या चारचाकी गाडीने झाडाला धडक दिल्याने शहरातील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. शहरातील एकाच वेळी चार युवकांचा अपघाती मृत्यू झाल्याने मनमाडकर हळहळले. बुधवारी (दि.११) दुपारी या युवकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देएक गंभीर जखमी : अनकवाडे शिवारात झाडावर आदळली कार

नाशिक : इंदूर- पुणे राज्य महामार्गावरील मनमाडजवळ अनकवाडे शिवारात शेजवळ पॉलिटेक्निक कॉलेजजवळ बुधवारी मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या चारचाकी गाडीने झाडाला धडक दिल्याने शहरातील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. शहरातील एकाच वेळी चार युवकांचा अपघातीमृत्यू झाल्याने मनमाडकर हळहळले. बुधवारी (दि.११) दुपारी या युवकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

बुधवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास येवल्याकडून मनमाडकडे कार (क्रमाक एमएच ४१ व्ही ७३१७) येत असताना अनकवाडे शिवारातील शेजवळ पॉलिटेक्निक कॉलेजसमोर भरधाव वेगात झाडावर आदळल्याने अपघात होऊन मनमाड शहरातील चार युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एका युवकाच्या हाता-पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये तौफिक गफार शेख (२५), प्रवीण राजू सकट (२३), दिनेश राजेंद्र भालेराव (३२), हे तिघे रा. एच.के. हायस्कूलच्या पाठीमागे, पाटील नगर, मनमाड आणि गोकुळ वाल्मीक हिरे (३८), रा. गौतमनगर, मनमाड यांचा दुर्दैवी अंत झाला, तर अजय संतोष वानखेडे (२३), रा. सिद्धार्थ कॉलनी, मनमाड हा या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेला आहे. अपघाताची खबर गावात वाऱ्यासारखी पसरताच हितचिंतकांसह मित्र परिवाराने येथील उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली. बुधवारी दुपारी या युवकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमाड- येवला रोडवरील फौजी ढाब्यावर रात्रीच्या सुमारास जेवण करून येत असताना हा अपघात घडल्याची शहरात चर्चा आहे.

 

इन्फो

 

शहरातील चार होतकरू युवकांचा अपघाती मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली. दरम्यान, दिनेश भालेराव हा मंडप व केटरिंगमध्ये काम करत होता, तर प्रवीण सकट हा मोबाइल रिपेअरिंग सेंटरमध्ये काम करत होता. तौफिक शेख हा सरबत दुकान लावत होता, तर गोकुळ हिरे हा वाहन चालक होता. जखमी अजय वानखेडे केटरिंगचे काम करतो. यामध्ये दिनेश भालेराव, प्रवीण सकट व गोकुळ हिरे हे तिघे विवाहित आहेत.

 

 

 

 

 

 

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू