अपघातातील जखमीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 19:21 IST2019-05-21T19:21:30+5:302019-05-21T19:21:41+5:30

सिन्नर : सिन्नर शहरात बारागावपिंप्री नाका ते हुतात्मा स्मारक रस्त्यावर दोन दुचाकींच्या समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातातील जखमीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

Accidental death death | अपघातातील जखमीचा मृत्यू

अपघातातील जखमीचा मृत्यू

सिन्नर : सिन्नर शहरात बारागावपिंप्री नाका ते हुतात्मा स्मारक रस्त्यावर दोन दुचाकींच्या समोरासमोर धडक होऊन
झालेल्या अपघातातील जखमीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
अपघातातील स्वार सदाशिव आहेर (३०) रा. बारागावपिंप्री रोड, सिन्नर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतोष रामनाथ गीते रा. ब्राम्हणवाडे हे मोटारसायकल (क्र . एमएच १५ जीएम ७८१८) हुतात्मा स्मारकाकडून पिंप्री नाक्याकडे भरधाव घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकी (क्र. एमएच १५ बीएल २२७५) ला चुकीच्या बाजूने जोराची धडक दिली. अपघातात दुचाकीवरील स्वार आहेर व संतोष गिते हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. आहेर यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Accidental death death

टॅग्स :Accidentअपघात