सीआरपीएफ जवानाचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:55 IST2019-05-23T00:54:27+5:302019-05-23T00:55:03+5:30
चाळीसगाव तालुक्यातील दहीवद येथील सीआरपीएफ जवान जितेंद्र चौधरी यांचे बुधवारी सकाळी अपघाती निधन झाले.

सीआरपीएफ जवानाचा अपघाती मृत्यू
सातपूर : चाळीसगाव तालुक्यातील दहीवद येथील सीआरपीएफ जवान जितेंद्र चौधरी यांचे बुधवारी सकाळी अपघाती निधन झाले. सध्या त्यांचे वास्तव्य अशोकनगर येथे होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी त्यांच्या मूळ गावी दहीवद येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
चौधरी हे लातूर येथील फायरिंग रेंजमध्ये कर्तव्य बजावत होते. बुधवारी सकाळी ते कर्तव्य बजावत असताना सहकाऱ्यांसमवेत फायरिंग पार्टीला जात असताना त्यांचा अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. चौधरी यांचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता.
अशोकनगर येथेच त्यांनी नुकतेच स्वत:चे घरदेखील घेतले होते. चौधरी यांचे मोठे बंधू हेदेखील लष्करात सेवेत आहेत. जितेंद्र चौधरी यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार
आहे.