अपघातातील जखमीचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 00:51 IST2020-12-24T20:30:33+5:302020-12-25T00:51:28+5:30
लोहोणेर : पंधरा दिवसांपूर्वी देवळा - लोहोणेर रस्त्यावर पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाला धडक दिल्याने जखमी झालेल्या बबन (प्रशांत ) रमेश देशमुख या ३५ वर्षीय विवाहित युवकाचे नाशिक येथे उपचार सुरू असताना निधन झाले.

बबन देशमुख

गेल्या १२ तारखेला सायंकाळी येथील प्लबिग व्यवसाय करीत असलेला बबन (प्रशांत) (३५, रा. लोहोणेर) हा देवळा येथून लोहोणेर येथे येत असताना अज्ञात वाहनाला धडक बसल्याने जबर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी नाशिक येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज सकाळी त्याचे निधन झाले.
गुरुवारी (दि.२४) दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे. मयत बबन देशमुख हा येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दिलीप देशमुख यांचा पुतण्या आहे.