अवैध जनावरे वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात; दोन गाई ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 18:40 IST2019-10-01T18:39:22+5:302019-10-01T18:40:23+5:30
कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतूक करणाºया पिकअप वाहनाचे मागचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात दोन गाई ठार झाल्या, तर बाकीची जनावरे जखमी झाले आहेत. डांगसौंदाणे रस्त्यावरील चौंधाणे (ता. बागलाण) गावाजवळ मंगळवारी पहाटे ही घटना घडली.

अवैध जनावरे वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात; दोन गाई ठार
कंधाणे : कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतूक करणाºया पिकअप वाहनाचे मागचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात दोन गाई ठार झाल्या, तर बाकीची जनावरे जखमी झाले आहेत. डांगसौंदाणे रस्त्यावरील चौंधाणे (ता. बागलाण) गावाजवळ मंगळवारी पहाटे ही घटना घडली.
अपघातानंतर चालक वाहन सोडून पसार झाला. परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्त वाहनातून जनावरांची सुटका करत चारापाण्याची सोय करून देत माणुसकीचे दर्शन घडविले आहे. पहाटे पिकअप वाहनातून (क्र . एमएच ४१ जी ३०१६) कत्तलीसाठी अवैध मार्गने चौदा गाई वाहून नेत असताना चौंधाणे गावाजवळ वाहनाचे मागचे टायर फुटल्याने दोन गाई ठार झाल्या, तर इतर जनावरे जखमी झाले.
अपघातानंतर चालक वाहन सोडून पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक निरभवणे, नीलेश पवार, बहिरम घटनास्थळी दाखल झाले. अपघातात ठार झालेल्या गार्इंची उत्तरीय तपासणी करण्यात आली. जखमी जनावरांवर उपचार करून त्यांची गोशाळेत रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली. येथील उपसरपंच रवींद्र मोरे, माजी सरपंच राकेश मोरे, पुंजाराम मोरे यांनी नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनातून या जनावरांची सुटका केली. अधिक तपास सटाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस नाईक नीलेश पवार, निरभवणे, बहिरम करीत आहेत.