चांदवड चौफुलीवर टेम्पो कारमध्ये अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:48 IST2021-01-28T21:58:39+5:302021-01-29T00:48:03+5:30
चांदवड : येथील मुंबई-आग्रा रोडवर पेट्रोलपंप चौफुलीवर आयशर टेम्पो व कार यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील दोघे सुदैवाने बचावले.

चांदवड चौफुलीवर टेम्पो कारमध्ये अपघात
चांदवड : येथील मुंबई-आग्रा रोडवर पेट्रोलपंप चौफुलीवर आयशर टेम्पो व कार यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील दोघे सुदैवाने बचावले.
देवळा येथून चांदवड रोडने सोमठाणदेश, ता. येवला येथे जात असलेली इंर्टिगा कार क्रमांक एम.एच. १५/ एच.सी. १६६७ सोमवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास चांदवड चौफुलीवर मनमाडम रस्त्याकडे वळण घेत होती. त्याच सुमारास मालेगावहून मुंबईकडे भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक एम.पी.०९ / जी.एच. १३०६ गतिरोधक असतानाही टेम्पोचा वेग कमी न करता कारला जोरदार धडक दिली. त्यात कार फरफपत जाऊन रस्त्याच्या बाजूला दोन्ही टायर फुटून नुकसान झाले.
कारमधील दोघे सुदैवाने बचावले. पोलिसांनी याबाबत शुभम पिंपळे रा. सोमठाणदेश यांनी चांदवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने पोलिसांनी टेम्पोचालक अजरुन भावेल, रा. धामनोद ता. धरमपुरी, जि. धार यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हरिश्चंद्र पालवी करीत आहेत.