उमराळेनजीक पेठ-जळगाव बसला अपघात, प्रवासी बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 20:55 IST2019-11-07T18:24:00+5:302019-11-07T20:55:34+5:30
सुमारे ५० ते ६० प्रवासी सुखरूप बचावले

उमराळेनजीक पेठ-जळगाव बसला अपघात, प्रवासी बचावले
पेठ : आगाराच्या पेठ - जळगाव बसला उमराळेनजीक चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघाताून सुमारे ५० ते ६० प्रवासी सुखरूप बचावले असले तरी रस्त्याच्या बाजूने चालणारा वृद्ध चाकाखाली अडकल्याने जखमी झाला.
जळगावकडे जाणारी बस समोरच्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला घसरली. यामध्ये दुचाकीस्वार वाचला मात्र रस्त्यावरून चालणाऱ्या वृद्धाला धडक बसल्याने तो चाकाखाली अडकला. घटनेनंतर बसचालकाने बस सोडून पलायन केले. परिसरातील नागरिकांनी जखमी वृद्धास बाहेर काढून दिंडोरी येथे उपचारासाठी दाखल केले. गाडीतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यातच काही अज्ञात इसमांनी अचानक तरी बसवर दगडफेक केल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.