ताहाराबाद : विंचूर-प्रकाशा महामार्गावर दसवेल गावाजवळ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात तुंगण येथील दुचाकीचालक दीपक राजाराम चौधरी (२४) याचा डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मृत झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सटाणा ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची जायखेडा पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार निंबा खैरनार, राजेंद्र गायकवाड, भोये आदी तपास करीत आहेत.
दसवेल गावाजवळ अपघात; तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 01:31 IST