परमोरीजवळ अपघात; पित्याचा मृत्यू, मुलगा गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 22:59 IST2021-10-19T22:58:46+5:302021-10-19T22:59:10+5:30
लखमापूर / दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील परमोरी गावाजवळ मोटारसायकल व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने पित्याचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

परमोरीजवळ अपघात; पित्याचा मृत्यू, मुलगा गंभीर
लखमापूर / दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील परमोरी गावाजवळ मोटारसायकल व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने पित्याचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
मंगळवारी (दि.१९) दुपारी २ वाजेच्या सुमारास दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा ते वरखेडा जाणाऱ्या रस्त्यावर परमोरी गावाजवळील मारुती मंदिरासमोर रोडवर ट्रक (क्र. एमएच ४३ यू ७२०७) आणि मोटारसायकल (क्र. एमए १५ एचडी ३८९३) यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघातात मोटारसायकलवरील मोतीराम गंगाधर गवळी (६०) हे जागीच ठार झाले, तर त्यांचा मुलगा गोरख मोतीराम गवळी हा गंभीर जखमी झाला.
ते दोघे चांदवड तालुक्यातील खडकजांब येथील रहिवासी आहेत. ऐन कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी अपघात झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.