ओझरजवळ कारचे टायर फुटल्याने अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 00:55 IST2022-05-26T00:55:30+5:302022-05-26T00:55:50+5:30
दहावा मैल जवळ नाशिकच्या दिशेने जात असलेल्या कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी झाले.

ओझरजवळ कारचे टायर फुटल्याने अपघात
ओझर : दहावा मैल जवळ नाशिकच्या दिशेने जात असलेल्या कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी झाले.
ओझरहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या कारचे टायर दहावा मैलजवळ फुटल्याने या गाडीने दोन पलट्या खात दुसऱ्या बाजूने मालेगावच्या दिशेने जात असलेल्या गाडीवरवर आदळली. यात कारमधील जगन्नाथ तिवारी (६०) हे ठार झाले तर कुंतीदेवी (पूर्ण नाव समजू शकले नाही), कपिल तिवारी, कौशल तिवारी हे गंभीर जखमी झाले. जखमींना नाशिक येथील तसेच ओझर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. तर टोल प्रशासनाने तत्काळ क्रेन पाठवत दोन्ही वाहनांना बाजूला केले. पुढील तपास ओझर पोलीस करत आहेत.