शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
5
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
6
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
7
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
8
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
9
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
10
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
11
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
12
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
13
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
14
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
15
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
16
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
17
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
18
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
19
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
20
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...

ओझरला सुमारे तीनशे हेक्टर शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 5:49 PM

ओझर : सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या आशा धुळीस मिळत असताना दिवसेंदिवस नुकसानीचा वाढता टक्का चिंतेत भर घालत आहे.

ठळक मुद्देसदरच्या पावसाने आगामी काळात बाजारात होणारी उलाढाल ठप्प होण्याची चिन्हे

ओझर : सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या आशा धुळीस मिळत असताना दिवसेंदिवस नुकसानीचा वाढता टक्का चिंतेत भर घालत आहे.ओझर परिसरात शेती मोठ्या प्रमाणात असून एकूण ७३५ हेक्टर द्राक्ष लागवडीपैकी जवळपास २२५ हेक्टर द्राक्ष शेतीचे नुकसान झाले असून ७२ हेक्टर वर सोयाबीन,मका,भुईमूग व इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पाऊस उघडल्यावर केला जाणारा खर्च दिवसेंदिवस महागात पडत असून असाच अवकाळी पाऊस आणखीन काही दिवस पडला तर जगणे मुश्किल होऊन जाणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सदरच्या पावसाने आगामी काळात बाजारात होणारी उलाढाल ठप्प होण्याची चिन्हे असून आधीच मंदीच्या संकटात असणाºया व्यापाऱ्यांनी याचा आतापासून धसका घेतला असल्याचे बोलले जात आहे.यंदाचा द्राक्ष हंगाम देखील तेजीत राहणार असल्याचे चित्र असले तरी मनासारखा माल न भेटलेच याची शाश्वती नसल्याने निर्यातदारांचे देखील कसब पणाला लागणार आहे. दरवर्षी प्रत्येक निर्यातदारांची बाहेर देशात ठरलेली बाजारपेठ असते. जागतिक बाजारात इतर देशांच्या वाढत्या आव्हानांना आतापर्यंत गुणवत्तेच्या आधारावर तोडीस तोड कलर व्हरायटी उपलब्ध होत असताना त्यासाठी दरवेळी सारखी अर्ली छाटणी देखील केली गेली होती, परंतु फ्लॉविरंग स्टेज मध्ये पावसाने दगा दिला आणि सगळे होत्याचे नव्हते झाले आहे.यंदा भारताच्या तुलनेत बाकी द्राक्ष उत्पादक देशांनी जर कलर व्हरायटीचा पुरवठा केला गेला तर तो पुढील हंगामात देखील पुन्हा मार्केट सेट करण्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतो. त्यामुळे उत्पादकांनी देखील कोणत्याही परिस्थितीत बाग वाचलीच पाहिजे असा चंग बांधला असून पाऊस जोरदार पडल्यावर देखील बागेत साचणाºया पाण्यात उभे राहून औषध फवारणी केली जात आहे.चौकट : ओझर क्षेत्रात तलाठी उल्हास देशमुख,सर्कल अधिकारी प्रशांत तांबे यांनी पंचनामे सुरू केले असून आतापर्यंत बाणगंगानगर क्षेत्र पूर्ण झाले आहे. इतर ठिकाणच्या भागाचेही पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून लवकरच ते पूर्ण होतील असे देशमुख यांनी सांगितले आहे.प्रतिक्रि या....यंदाच्या अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ डोळ्यासमोर नुकसान ग्रस्त होत असताना सारख्या पडत असलेल्या पावसामुळे नेमके उत्पादन किती होईल याची शास्वती आता देणे कठीण आहे. गुणवत्ता आणि दर्जा टिकवताना देखील मोठी कसरत करावी लागणार असून निर्यातदारांच्या दृष्टीने यंदाचे वर्ष आव्हानाचे ठरू शकते.तुषार शिंदे, ओझर. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस