शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

सुमारे ३०० जणांचा एकाच घरावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:28 AM

जागेचा ताबा मिळविण्याच्या वादावरून सुमारे दोनशे तरुण आणि शंभर महिलांनी एका घरात घुसून धुडगूस घातल्याने परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

देवळाली कॅम्प : जागेचा ताबा मिळविण्याच्या वादावरून सुमारे दोनशे तरुण आणि शंभर महिलांनी एका घरात घुसून धुडगूस घातल्याने परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या हल्ल्यात घरातील दागिन्यांची लूट करण्याबरोबरच अनेक वस्तू लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी ४७ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, १२ जणांना अटक करण्यात आली आहे.जागेचा ताबा मिळविण्याच्या वादावरून बालगृहरोडवरील दशरथ पाळदे यांच्या घरात घुसून जमावाने धुडगूस घातल्याचे फिर्यादित म्हटले आहे. या हल्ल्यात घरातील सोन्याचे ऐवज, मौल्यवान वस्तू लंपास केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.दशरथ पाळदे यांच्या घरासमोर अचानकपणे मोठा जमाव जमू लागला. जमावाने अचानक घरात येत पाळदे यांच्यावर गज व काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, घरातील अन्य महिला व मुले यांनाही मारहाण करण्यात आली. यामुळे पाळदे कुटुंबीयांची धावपळ उडाली. नागरिकांनी सदर घटनेबाबत आयुक्तालयात माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.वाहनावर नगरसेवक लोगोरविवारी सकाळी लॅमरोडच्या जागेसंदर्भात चारशे-पाचशे गुंडाचे टोळके आणल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे दोन चारचाकी व दोन मालवाहतूक गाड्या जप्त करण्यात आल्या. जमा केलेल्या दोन्ही वाहनांवर नाशिक मनपाचे बोधचिन्ह आहे. सदर वाहने आणणारा व जागा ताब्यात घेणारा नाशिक मनपाचा नगरसेवक असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस