सगेसोयरे राजपत्र मसुदा रद्द करा; अन्यथा मतदान विसरा, समता परिषदेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 17:40 IST2024-02-01T17:39:27+5:302024-02-01T17:40:40+5:30
शासनाकडून नुकतेच कुणबी प्रमाणपत्राबाबत शासन आदेश काढला असून सगेसोयरे यांनादेखील प्रमाणपत्र देण्याबाबतचा मसुदा राजपत्रात दिला आहे.

सगेसोयरे राजपत्र मसुदा रद्द करा; अन्यथा मतदान विसरा, समता परिषदेचा इशारा
नाशिक : मराठा कुणबी आरक्षणाच्या बाबतीत काढण्यात आलेले सगेसोयरे शासन राजपत्र मसुदा रद्द करण्यात यावा अन्यथा ओबीसी भटके विमुक्तांचे मतदान विसरा अशा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या देण्यात आला. यावेळी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील आमदार, खासदारांच्या कार्यालयावर जाऊन निवेदने दिली तसेच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनादेखील निवेदन देण्यात आले.
शासनाकडून नुकतेच कुणबी प्रमाणपत्राबाबत शासन आदेश काढला असून सगेसोयरे यांनादेखील प्रमाणपत्र देण्याबाबतचा मसुदा राजपत्रात दिला आहे. हा मसुदा रद्द करण्यात यावा यासाठी गुरुवारी (दि.०१) समता परिषदेच्या नाशिक शहराध्यक्षा कविता कर्डक यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींना निवेदन दिले. खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.