हेरंब गणेश मंदिरात अभिषेक पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:46 IST2021-03-02T22:11:56+5:302021-03-03T00:46:28+5:30
ब्राह्मणगाव : येथील श्री हेरंब गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त हेरंब सेवा समितीचे निंबा अहिरे यांच्या हस्ते अभिषेक पूजन करण्यात आले.

श्री हेरंब गणरायाची प्रसन्न मुद्रा
ठळक मुद्देश्री गणरायाला पंचामृताने अभ्यंग स्नान करून २१ अथर्वशीर्ष पठण
ब्राह्मणगाव : येथील श्री हेरंब गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त हेरंब सेवा समितीचे निंबा अहिरे यांच्या हस्ते अभिषेक पूजन करण्यात आले.
प्रथम श्री गणरायाला पंचामृताने अभ्यंग स्नान करून २१ अथर्वशीर्ष पठण करत अभिषेक पूजन करण्यात आले. त्यानंतर मोदक व फळांचा नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली. पौरोहित्य दादू जोशी, सुमित धुमाळ, हरीश कानडे, भाऊ पगार यांनी केले. मंदिरात विविध प्रकारची रांगोळी सादरीकरण सृष्टी बागड यांनी केले.
अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांनी दिवसभर दर्शन घेतले. सायंकाळी हरिपाठ, महानैवेद्य, महाआरती कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला.