नाईक महाविद्यालयात अभाविपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:55 IST2019-10-15T23:13:26+5:302019-10-16T00:55:17+5:30
खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या ईबीसी सवलतीची रक्कम गेल्या काही महिन्यांपासून महाविद्यालयाच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. सदर रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात महाविद्यालयीन प्रशासनातर्फे जाणूनबुजून दिरंगाई करण्यात येत असल्याचा आरोप करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे क्रांतिवीर वसंतराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (दि.१५) आंदोलन करण्यात आले.

नाईक महाविद्यालयात अभाविपचे आंदोलन
नाशिक : खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या ईबीसी सवलतीची रक्कम गेल्या काही महिन्यांपासून महाविद्यालयाच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. सदर रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात महाविद्यालयीन प्रशासनातर्फे जाणूनबुजून दिरंगाई करण्यात येत असल्याचा आरोप करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे क्रांतिवीर वसंतराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (दि.१५) आंदोलन करण्यात आले.
ईबीसी सवलतीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होत नसल्याने विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत असून, वारंवार पाठपुरावा करूनही महाविद्यालयीन प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचा आरोप करून अभाविपने महाविद्यालयीन परिसरात जोरदार घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी चार दिवसांत विद्यार्थ्यांच्या ईबीसी सवलतीची रक्कम परत करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात सागर शेलार, अथर्व कुळकर्णी, सिद्धेश खैरनार, राकेश साळुंखे, सौरभ धोत्रे, सुयश सोनी, अश्रूबा वाघमारे, अक्षय पाटील, गणेश पाटील, राजेश्वरी पवार, प्रीतेश वाघमारे, देवेश चिंचाळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.