नाशिक-पुणे महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बस पुलावरून कोसळली; एक ठार, 34 जखमी

By धनंजय वाखारे | Published: April 14, 2024 10:09 AM2024-04-14T10:09:48+5:302024-04-14T10:10:13+5:30

महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी आराम बस पुण्याहून नाशिककडे जात असताना पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. 

A private travel bus fell from the bridge at Gonde Shivar on the Nashik-Pune highway; One killed, 34 injured | नाशिक-पुणे महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बस पुलावरून कोसळली; एक ठार, 34 जखमी

नाशिक-पुणे महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बस पुलावरून कोसळली; एक ठार, 34 जखमी

- सचिन सांगळे

नांदूरशिंगोटे : नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथील पुलावरून महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी आराम बस (एम एच 14 सीडब्ल्यू 9072) खाली कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये एक प्रवासी ठार तर 34 जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती वावी पोलिसांनी दिली आहे. महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी आराम बस पुण्याहून नाशिककडे जात असताना पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. 

जखमी रुग्णांना त्वरीत सिन्नर येथील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, पोलीस उपनिरीक्षक देविदास लाड, नितीन कदम तसेच अन्य सहकारी आणि महामार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच अपघात झाल्यानंतर दहा मिनिटातच नांदूरशिंगोटे व सिन्नर येथील रुग्णवाहिका तातडीने दाखल होत स्थानिक ग्रामस्थ व पोलीस यांच्या मदतीने जखमींना बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान अपघातात मृत झालेल्या प्रवाशाचे नाव कश्यप मुकेशभाई पाठक (35) रा. अहमदाबाद, गुजरात येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जखमी प्रवाशांची नावे
अब्दुल रज्जाक, सोनाली शेजवळ, मालता शेजवळ, सुंधी सोनी, अशरीध रेड्डी, प्रकाश कौटि, प्रियंका आलेवर, पवन पांचाळ, शुभम जाधव, भगवान इंगळे, अनिल निकमले, मुकेश सोळंकी, शिवाजी नालेकर, राणी कांची, अमित पांचाळ, निखिल कांडेकोरी, प्रियांशु अलवार, महेश बिडवे, तुषार मिस्त्री, पवन पावरा, राधेश्याम पावरा, रितेश भिल, बशीर चेतन सूर्यवंशी, सुरेश वाघेला मोहम्मद अली, मेहुल प्रजापती, सोनम पवार, विवेक मिस्त्री यांचा समावेश आहे.

Web Title: A private travel bus fell from the bridge at Gonde Shivar on the Nashik-Pune highway; One killed, 34 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.