लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दिड वर्षे अत्याचार; अहमदनगर जिल्ह्यातील युवकावर गुन्हा दाखल
By नामदेव भोर | Updated: June 14, 2023 16:35 IST2023-06-14T16:32:03+5:302023-06-14T16:35:45+5:30
२१ वर्षीय युवकावर आडगाव पोलिस ठाण्यात बलात्कार तसेच बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसारनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दिड वर्षे अत्याचार; अहमदनगर जिल्ह्यातील युवकावर गुन्हा दाखल
नाशिक : आडगाव परिसरातील एका अल्पवयीन मुलीला ओळखीचा फायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून तब्बल दीड वर्षे शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील चंदनवाडी येथे एका २१ वर्षीय युवकावर आडगाव पोलिस ठाण्यात बलात्कार तसेच बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसारनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील राजुरगाव चंदनवाडी येथे राहणाऱ्या संशयित आरोपी परवेज कादिर शेख ( २१) याने आडगाव परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिच्याशी जवळीक निर्माण करत लग्नाचे आमिष दाखवून जानेवारी २०२१ ते जून २०२३ या दिड वर्षाच्या कालावधीत वेळोवेळी तिला लॉजवर नेत शारीरिक संबंध ठेवले. या घडलेल्या प्रकाराबाबत पिडीतेने आडगाव पोलिस ठाण्यात धाव घेत घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली त्यावरून आडगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी परवेज शेख करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुभाष जाधव तपास करत आहेत.