जिल्ह्यात ९९ बाधित; १०२ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 01:38 IST2021-08-09T01:37:54+5:302021-08-09T01:38:57+5:30
जिल्ह्यात रविवारी (दि. ९) एकूण ९९ रुग्ण कोरोनाबाधित झाले असून १०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, तीन जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८५३३ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात ९९ बाधित; १०२ कोरोनामुक्त
नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि. ९) एकूण ९९ रुग्ण कोरोनाबाधित झाले असून १०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, तीन जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८५३३ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ३ हजार ३२४ वर पोहोचली असून त्यातील ३ लाख ९३ हजार ७१५ नागरिक पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णांची संख्या १०७६ असून कोरोनामुक्त नागरिकांचे प्रमाण सरासरी ९७.६२ टक्क्यांवर पोहोचले आहे. दऱम्यान, प्रलंबित अहवालांच्या संख्येतही काहीशी घट येऊन ही संख्या २४८ पर्यंत खाली आली आहे.