शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

मनपाकडून ९८ टक्के तक्रारींचे निवारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 1:10 AM

सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या ई-कनेक्ट अ‍ॅपला मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रशासन तक्रारींचे निराकरणही करीत आहेत. या अ‍ॅपवरून प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी ९८.२५ टक्के इतक्या तक्रारींचे निवारण करण्यात आले आहेत.

नाशिक : सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या ई-कनेक्ट अ‍ॅपला मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रशासन तक्रारींचे निराकरणही करीत आहेत. या अ‍ॅपवरून प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी ९८.२५ टक्के इतक्या तक्रारींचे निवारण करण्यात आले आहेत.  महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या जुन्या अ‍ॅपचे नूतनीकरण करून त्यात अनेक सुविधा दिल्या आहेत. कोणत्याही तक्रारीसाठी नागरिकांना महापालिकेत येण्याची वेळ येऊ नये यासाठी या अ‍ॅपची व्यवस्था आहे. विशेष म्हणजे तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने चोवीस तासात ती तक्रार ओपन केली नाही तर त्याला अ‍ॅटो जनरेटेड मेमो बजावला जात असल्याने अधिकाºयांनी खूप गांभीर्याने घेतले आहे. इतकेच नव्हे तर खाते प्रमुखांनादेखील तक्रारींचे निराकरण न झाल्यास जबाबदार धरून चौकशी केली जात असल्याने तक्रार करताच सत्वर कारवाई केली जाते.प्रशासनाकडे आत्तापर्यंत २२ हजार ७६८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील २२ हजार ३७० तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. म्हणजेच ९८.२५ टक्के इतक्या तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्यासाठी महापालिकेने ही सुविधा उपलब्ध करून दिली असून, नागरिकांनादेखील तक्रार निराकरणाचा सुखद अनुभव येत आहे.आता ४३ सेवा आॅनलाइनमहापालिकेने विविध प्रकारचे दाखले आणि परवानग्यांसाठी आता आॅनलाइन व्यवस्था केली असून, त्यानुसार ४३ प्रकारच्या परवानग्या दिल्या जात आहेत. आॅनलाइन कागदपत्रे पाठविणे आणि तसेच पेमेंट करून ही सुविधा दिली जात असून, नुकताच या सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे.नागरिक म्हणतातसेवा चांगलीचमहापालिकेच्या या अ‍ॅपवर रेटिंगचीदेखील सुविधा असून, त्यानुसार महापालिकेला चांगली सेवा दिल्याचा अभिप्राय महापालिकेने नोंदविला आहे. एखादी तक्रार नोंदविल्यानंतर तिच्या निराकरणानंतर नागरिकांना काय वाटते याबाबत क्रमवारीची सुविधा देण्यात आली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाonlineऑनलाइन