ओबीसी आरक्षण नसल्याने ९४ प्रभाग होणार खुले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:19 IST2021-08-27T04:19:55+5:302021-08-27T04:19:55+5:30

नाशिक महापालिकेची सातवी पंचवार्षिक निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार असून त्यासाठी २०११ च्या जनगणनेच्या आधारे यंदा प्रभागरचना होणार ...

94 wards to be open due to lack of OBC reservation! | ओबीसी आरक्षण नसल्याने ९४ प्रभाग होणार खुले!

ओबीसी आरक्षण नसल्याने ९४ प्रभाग होणार खुले!

नाशिक महापालिकेची सातवी पंचवार्षिक निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार असून त्यासाठी २०११ च्या जनगणनेच्या आधारे यंदा प्रभागरचना होणार आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेत नाशिक शहराची एकूण लोकसंख्या १० लाख ८६ हजार ५३ इतकी हेाती. त्याआधारे ३१ बहुसदस्यीय प्रभागांची रचना करण्यात आली. यात अन्य प्रभागात चार सदस्य असले तरी एका प्रभागात केवळ तीन सदस्य निवडून द्यावे लागले. एकूण नगरसेवक संख्या १२२ झाली होती. नव्या प्रभागरचनेत आता ३१ प्रभागांऐवजी १२२ एक सदस्यीय प्रभाग (वॉर्ड) असतील. त्यात दरवेळीप्रमाणे ५० टक्के जागा या महिलांसाठीच असतील. याशिवाय सामाजिक आरक्षणेदेखील असणार आहेत. मात्र, ओबीसी आरक्षणासाठी असलेल्या ३३ नगरसेवकांच्या जागा यंदा नसतील. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने त्यांना देण्यात येणारे २७ टक्के आरक्षण यंदा नसेल असे तूर्तास नियोजन आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल असून त्यावर निर्णय न झाल्यास यंदा ओबीसी आरक्षणाच्या ३३ जागा या खुल्या प्रवर्गात परावर्तित होतील. म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी मुळात असलेल्या जागा आणि ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने एकूण ९४ जागा मिळतील, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

ओबींसींची जनगणना होत नसते. मात्र, यंदा त्याबाबत आग्रह सुरू आहे. दुसरीकडे अनुसूचित जाती आणि जमातींची लाेकसंख्या लक्षात घेतली तर अनुसूचित जातीसाठी १८ आणि जमातींसाठी ९ प्रभाग असणार आहेत. त्यातही अनुसूचित जातीच्या १८ पैकी ९ जागा अनुसूचित जातीच्या महिला तर जमातीच्या ९ पैकी पाच जागादेखील याच प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असतील, असेही महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

इन्फेा...

एकूण लोकसंख्या १०,८६,०५३

अनुसूचित जातीची लोकसंख्या- २,१४,६२०

अनसूचित जमातीची लोकसंख्या- १,०७,४५६

Web Title: 94 wards to be open due to lack of OBC reservation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.