नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी एकूण ९० रुग्ण बाधित झाले असून ९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात दिवसभरात २ नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८६४४ वर पोहोचली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांच्या संख्येत बरीच घट येऊन ती संख्या ७२८ वर पोहोचली आहे; तर जिल्ह्यातील कोरोना उपचारार्थी संख्या प्रदीर्घ कालावधीने पुन्हा नऊशेच्या खाली म्हणजे ८९७ वर पोहोचली आहे.