शेतकरी कर्जमाफीसाठी जिल्हा बॅँकेला ८७० कोटी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 01:57 IST2020-07-11T22:40:34+5:302020-07-12T01:57:42+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफीचे ८७० कोटी रु पये गुरु वारी वर्ग केले आहेत. गत चार महिन्यांपासून महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा हा निधी असून, एनडीसीसीकडे वर्ग झाला आहे.

शेतकरी कर्जमाफीसाठी जिल्हा बॅँकेला ८७० कोटी !
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफीचे ८७० कोटी रु पये गुरु वारी वर्ग केले आहेत. गत चार महिन्यांपासून महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा हा निधी असून, एनडीसीसीकडे वर्ग झाला आहे.
या निधीचा विनियोग कसा करावा त्याचे निकष व अटी निश्चित केल्या आहेत. राज्यातील नाशिक, बीड, उस्मानाबाद या जिल्हा बँकांना सहकार विभागाने निधी वर्ग केला. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा निधी ग्रामपंचायत आचारसंहितेमुळे वितरीत करता आला नव्हता. त्यामुळे खरीप हंगाम सुरू झाला, मात्र या बँकांकडे रोखता व रोकड दोन्ही नसल्याने पीककर्ज वितरण बंद झाले होते. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता.
सहकार विभागाने निधी वर्ग करताना त्याचे वितरण कसे करावे, याचे निकष निश्चित केले आहेत. या निधीचा उपयोग बँकेच्या संचालकांना आपल्या मर्जीतील संस्था, व्यक्तींच्या ठेवी परत करण्यासाठी करता येणार नाही. हा निधी केवळ पीककर्ज वितरणासाठीच करता येणार आहे. त्याबाबत प्राधान्यक्रम निश्चित केल्यावर त्याला मंजुरी घ्यावी लागणार आहे.
राज्य शासनाने कृषी कर्ज वितरणासाठी वारंवार सूचना केल्या होत्या. मात्र त्याची अपेक्षित अंमलबजावणी झालेली नव्हती. नाशिक जिल्हा बंकेला भाजप-शिवसेना सरकारच्या कार्यकाळात घोषित झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेचेही पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे राज्य सरकारने आता ८७० कोटींची निधी वितरीत केला आहे.