शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
4
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
5
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
6
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
7
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
8
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
9
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
10
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
11
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
12
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
13
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
14
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
15
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
16
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
17
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
18
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
19
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
20
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका

नाईक संस्थेसाठी ७९ टक्के मतदान; आज मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:02 IST

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत २९ जागांसाठी शनिवारी (दि. २०) संस्थेच्या ८ हजार ६९४ सभासदांंपैकी ...

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत २९ जागांसाठी शनिवारी (दि. २०) संस्थेच्या ८ हजार ६९४ सभासदांंपैकी ६ हजार ८४६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला असून, संध्याकाळी मतदानप्रक्रिया संपेपर्यंत सरासरी ७९ टक्के मतदान झाले आहे. गत निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानात २ टक्क्यांनी घसरण झाली असून, त्याचा निकालावर निश्चित प्रभाव दिसण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. रविवारी मतमोजणी झाल्यानंतर संस्थेवर नवीन संचालक मंडळ कोणाच्या नेतृत्वात काम करणार ते स्पष्ट होऊ शकणार आहे.नूतन संचालक मंडळ निवडून देण्यासाठी सभासदांनी शनिवारी(दि. २०) संस्थेच्या मतदान केंद्रावर रांगा लावून मतदान केले. केंद्रावर दोन्ही पॅनलच्या उमेदवार प्रतिनिधींनी मतदारांच्या ओळखपत्रांविषयी घेतलेल्या आक्षेपांवरून बाचाबाची व शाब्दिक वादासोबतच हमरीतुमरीचे प्रकारही घडले.मात्र पोलीस व निवडणूक नियंत्रण मंडळाने वेळीच हस्तक्षेप करून संपूर्ण मतदानप्रक्रिया शांततेत पार पाडली. या निवडणुकीत सत्ताधारी कोंडाजी आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील प्रगती व तुकाराम दिघोळे व पंढरीनाथ थोरे यांच्या नेतृत्वातील क्रांतिवीर पॅनलमध्ये सरळ लढत असून, मतदानप्रक्रिया झाल्यानंतर दोन्ही पॅनलने विजयाचा दावा केला आहे. मात्र सत्ताधारी विरोधकांमध्ये संस्थेच्या जागा विक्री, सभासद नोंदणी, मयत सभासदाच्या वारसांना सभासदत्व, विकासकामांचे श्रेयवाद आदी मुद्द्यांवरून प्रचंड आरोप प्रत्यारोप करताना मोठ्या प्रमाणात चिखलफेक झाल्यामुळे दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दरम्यान, निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गजेंद्र सानप यांनी मतदान सुरू होण्यापूर्वी सरस्वती पूजन केले. तसेच दोन्ही पॅनलच्या अध्यक्षपदाचे उमेदवार आव्हाड व थोरे यांनी एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन मतदानास सुरुवात झाली. संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सहचिटणीस, ६ विश्वस्त, २ महिला प्रतिनिधी, तर १७ तालुका प्रतिनिधी अशा एकूण २९ जागांसाठी सकाळी ७ ते ५ वाजे दरम्यान मतदान झाले.इन्फो-बाचाबाची, हमरीतुमरीचे प्रकारओळखपत्र आणि मतदार यादीत नावातील भिन्नतेमुळे अनेक केंद्रांवर सभासदांना मतदानापासून रोखण्यात आले. यावेळी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी आरडा-ओरड करीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. काही मतदान केंद्र्रावर उमेदवारांच्या हस्तक्षेपावर दोन्हा बाजूने आक्षेप घेतल्याने बाचाबाची आणि हमरीतुमरीसारखे प्रकार घडले. नांदगाव तालुक्यासाठी असलेल्या बुथवर लाइट गेल्याने काहीवेळ अंधारात मतदान करावे लागले. सिन्नर तालुक्याच्या एका बुथवर उमेदवार मनोज बुरकूल व शशीकांत आव्हाड यांच्यात बाचाबाची झाली. असे किरकोळ अपवाद वगळता दिवसभरात मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली.इन्फो-पावसाचा व्यत्ययसक ाळच्या सत्रात ११ वाजेपर्यंत सुमारे ३० टक्के मतदान झाल्यानंतर दुपारी पावसाच्या व्यत्ययामुळे मतदानाला संथ प्रतिसाद मिळाला. परंतु, दुपारनंतर पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्याने ग्रामीण भागातील सभासदांनी मतदान केंद्रावर गर्दी करून मतदानाचा हक्क बजाविला. त्यामुळे सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३९ बुथवर ७९ टक्के मतदान झाले. मात्र शहरातील अनेक सभासदांनी निवडणुकीकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.इन्फो-अशी होणार मतमोजणीनाईक संस्थेची निवडणूक प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाल्यानंतर मतमोजणीची प्र्रक्रिया रविवारी (दि.२१) चोपडा लॉन्स येथे सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण ८० टेबल राहणार असून, प्रत्येक टेबलवर दोन कर्मचारी व दोन प्रतिनिधी असे एकूण १६० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. प्रथमत: ३९ मतपेट्यांमधील मतपत्रिकांचे २५च्या पटीत विभागणी केली जाईल. यानंतर प्रत्येक उमेदवारास मिळालेल्या मतांची नोंदणी झाल्यानंतर अकराव्या फेरीअखेर उमेदवाराला प्राप्त मतांची बेरीज केली जाईल. याप्रमाणे एकूण ३९ बुथवरील मतपेट्यांमध्ये बंदिस्त मतांची बेरीज केल्यानंतर सर्वाधिक मतदान असलेल्या उमेदवारास विजयी घोषित केले जाईल. रात्री ९ वाजेपर्यंच निकाल हाती येण्याची शक्यता निवडणूक मंडळाकडून व्यक्त करण्यात आली आहे.इन्फो-तालुकानिहाय झालेले मतदानतालुका मतदार झालेले मतदान टक्केवारीनाशिक २५३८ १८३१ ७२.१४दिंडोरी ५८७ ५३१ ९०.४५मालेगाव १७१ १०२ ६०येवला ५९९ ४९५ ८३नांदगाव ९०८ ७१८ ७९.०७निफाड २०४० १६७२ ८१.८०सिन्नर १८४५ १४९७ ८१.१३(फोटो- २०पीएचजेएल १२९) नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी आलेल्या मतदारांना आपल्याच पॅनल कौल देण्यासाठी हात जोडून विनंती करताना सत्ताधारी प्रगती पॅनलचे नेते कोंडाजी आव्हाड व क्रांतिवीर पॅनलचे पंढरीनाथ थोरे यांच्यासह अ‍ॅड. पी. आर. गिते, मनोज बुरकुल आदी.(फोटो- २०पीएचजेएल १३०) नाईक श्क्षिण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी संस्थेच्या सभासदांनी केलेली गर्दी.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षणElectionनिवडणूक