कळवण : मान्सूनच्या आगमनानंतर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व शेती मशागतीचे कामे पूर्ण करून खरीप पिक पेरणीला सुरु वात होवून तालुक्यात ७५ टक्के पेरणी झाल्याचा शासकीय अहवाल आहे. निसर्गचक्र ी वादळांनंतर सलग तीन दिवस पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीसाठी धावपळ उडाली. यंदा पुन्हा लष्करी अळीने थैमान घातले असल्यामुळे पारंपारिक मका पिकाला बहुतांशी शेतकरी बांधवांनी फाटा दिला असला तरी तालुक्यात १८ हजार हेक्टर क्षेत्रात मक्याची ९९ टक्के पेरणी झाली असल्यामुळे पसंती दर्शवली आहे.यंदा सर्वाधिक पेरणी मक्याची झाली असून भात व नागलीची कोठेही लागवड झाली नाही. तालुक्यात पेरणी झाल्यानंतर पावसाने पाठ फिरविल्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची चिन्हे असतांना काही भागात पावसाने सलामी दिली मात्र काही भागात पाठ फिरवली.लष्करी अळी नियंत्रणासाठी ...कळवण तालुक्यातील साकोरे, साकोरे पाडा ,कळवण बु., वाडी बु., पाळे खु., पाळे बु., नरु ळ गावामध्ये कृषी विभागाच्या यंत्रणेने पाहणी केल्यावर मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. किमान प्रति एकर १० पक्षी थांबे उभारावेत म्हणजे त्यावर पक्षी बसून आसपासच्या क्षेत्रातील अळ्या वेचून खातील व काही प्रमाणात अळ्यांचा बंदोबस्त होईल असे कृषी विभागाने शेतकºयांना सूचित केले. तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, मंडळ कृषी अधिकारी सीताराम पाखरे, कृषी सहाय्यक कैलास मोरे, दिलीप गवळी, कलाबाई पवार, ए. जी. राऊत यांनी तालुक्यात शेतीशाळा, कार्यशाळा, बैठका घेऊन अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव संदर्भात मार्गदर्शन केले.बांधावर खत, बियाणे -खरीप २०२० या आर्थिक वर्षात कृषि विभागामार्फत योजनानिहाय प्रकल्प कळवण तालुक्यात राबविण्यात येत असून प्रकल्प गाव निहाय बियाणे, खते शेतकºयांना बांधापर्यंत पोहच केले आहे.
कळवण तालुक्यात ७५ टक्के पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 18:54 IST
कळवण : मान्सूनच्या आगमनानंतर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व शेती मशागतीचे कामे पूर्ण करून खरीप पिक पेरणीला सुरु वात होवून तालुक्यात ७५ टक्के पेरणी झाल्याचा शासकीय अहवाल आहे. निसर्गचक्र ी वादळांनंतर सलग तीन दिवस पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीसाठी धावपळ उडाली. यंदा पुन्हा लष्करी अळीने थैमान घातले असल्यामुळे पारंपारिक मका पिकाला बहुतांशी शेतकरी बांधवांनी फाटा दिला असला तरी तालुक्यात १८ हजार हेक्टर क्षेत्रात मक्याची ९९ टक्के पेरणी झाली असल्यामुळे पसंती दर्शवली आहे.
कळवण तालुक्यात ७५ टक्के पेरणी
ठळक मुद्देमक्याची सर्वाधिक ९९ टक्के पेरणी : लष्करी अळीचे थैमान