७३ हजारांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 01:19 IST2018-12-21T01:18:45+5:302018-12-21T01:19:00+5:30

सिन्नर तालुक्यातील भोकनी गावाच्या रहिवासी असलेल्या बकुबाई मारुती भाबड (६५) या काही कामानिमित्त शहरात आल्या होत्या. बुधवारी (दि.१९) त्या निमाणी स्थानकात आल्या असता, अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेवर डल्ला मारून सुमारे ७३ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.

 73 thousand jewelery lamps | ७३ हजारांचे दागिने लंपास

७३ हजारांचे दागिने लंपास

नाशिक : सिन्नर तालुक्यातील भोकनी गावाच्या रहिवासी असलेल्या बकुबाई मारुती भाबड (६५) या काही कामानिमित्त शहरात आल्या होत्या. बुधवारी (दि.१९) त्या निमाणी स्थानकात आल्या असता, अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेवर डल्ला मारून सुमारे ७३ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.
चोरट्याने महिलेच्या बॅगेत ठेवलेली ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी, २ हजार रुपये किमतीच्या बुुगड्या, दहा हजार रुपयांच्या सोन्याच्या कानचेन, सोन्याची अंगठी यांसह १५ हजारांची रोख रक्कम असा एकूण ७३ हजारांचा ऐवज चोरट्याने हातोहात लंपास केला.

Web Title:  73 thousand jewelery lamps