नाशिक : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, मंगळवारी ७० रुग्ण बरे झाले असले तरी तेवढ्याच (६९) नव्या रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात कोरोनाची लाट ओसरून जनजीवन पूर्वपदावर आले असतानाच कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. काही भागांत नव्याने रुग्ण वाढत आहे. मंगळवारी जिल्ह्यात एकूण ३८२ रुग्ण उपचार घेत आहेत. नव्याने वाढ झालेल्या रुग्णांमध्ये नाशिक मनपा हद्दीतील ३४, ग्रामीण भागातील ३१, मालेगाव मनपा हद्दीत दोन रुग्णांचा समावेश असून, दोन रुग्ण जिल्हाबाह्य असल्याचे आढळून आले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी त्याचबरोबर गर्दीच्या ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
७० झाले बरे अन् ६९ रुग्ण पुन्हा वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2022 01:48 IST