नाशिक : विकृत मनोवृत्तीतून फेसबुकचा वापर करणाऱ्या लातूर येथील विश्वजित प्रकाशराव जोशी (२६, रा़ अवंतीनगर) या युवकास नाशिकच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे़ त्याने २० महिलांच्या नावे बनावट अकाउंट तयार करून ६५८ महिलांना अश्लील मेसेजेस आणि व्हिडीओ कॉल केले आहेत़तिडके कॉलनीत राहणाºया एका सव्वीस वर्षीय युवतीस सोनल शितोळे या मुलीच्या नावे फेसबुक अकाउंटवरून अश्लिल संदेश व फोटो पाठविण्यात आले़ तरुणीने ते अकाउंट ब्लॉक केले आणि आपली सुटका झाली, असा तिचा समज झाला़ मात्र, तिला पुन्हा सोनल जमाल मुलीच्या नावे अश्लिल मेसेज व फोटो येणे सुरू झाले़ मेसेंजरवर व्हिडीओ कॉल्सही आले़ कॉल उचलल्यानंतर समोर एक नग्न पुरुष होता.फेसबुकवरील सततचे अश्लिल संदेश व व्हिडीओमुळे तिने शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ सायबर पोलिसांनी दोन अकाउंटचे डिटेल्स काढले़ त्यात लातूरच्या अवंतीनगरमधील विश्वजित जोशी याचे नाव समोर आले. पोलिसांनी जोशीविरोधात विनयभंग तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला़ लातूरमध्ये जोशी यास अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
६५८ महिलांना अश्लील मेसेजेस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:05 IST