घोटीत ६३ लाखांची घरफोडी

By Admin | Updated: January 23, 2016 22:45 IST2016-01-23T22:43:33+5:302016-01-23T22:45:03+5:30

भरवस्तीतील प्रकार : व्यापारी बाजारपेठेत भीतीचे वातावरण

63 lakhs of crores of bribe | घोटीत ६३ लाखांची घरफोडी

घोटीत ६३ लाखांची घरफोडी

घोटी : येथील डहाळे ज्वेलर्सच्या संचालकाच्या घरातून चोरट्यांनी सुमारे ५० लाखांची रोख रक्कम आणि दागिन्यांसह तब्बल ६३ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घोटी येथील सराफ कैलास तुकाराम डहाळे यांचे डहाळे ज्वेलर्स हे दागदागिन्यांचे दुकान आहे. गेल्या काही दिवसांपासून डहाळे कुटुंबीय तीर्थयात्रेला गेले होते. त्यामुळे त्यांच्या संत नरहरीनगर येथील राहत्या बंगल्याला कुलूप होते.
डहाळे कुटुंबीय सायंकाळी गावाहून परत आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा तुटलेला दिसला. मागील खिडकी तोडून चोरटे घरात घुसल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ घोटी पोलिसांना कळवले. पोलिसांनी धाव घेत सर्व माहिती घेतली. डहाळे यांनी अन्य कोणाला देण्यासाठी आणलेली ५० लाखांची रोख रक्कम, घरातील दागिने, व्यावसायिक कामासाठी असलेले सोने, चांदी, हिरे आदि दागिने घरफोडीमध्ये लंपास झाले आहेत. सुमारे ६३ लाखांपर्यंतचा ऐवज चोरीला गेल्याचा अंदाज
असून आकडा वाढण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी पोलिसांनी नोंद
घेतली असून, घोटीचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कमलेश बच्छाव, नवनाथ पवार, प्रदीप कदम आदिंनी जलदगतीने तपास सुरू केला आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात
आला.
दरम्यान, या मोठ्या घरफोडीमुळे घोटी शहरात खळबळ माजली असून, व्यापारीवर्गात घबराट पसरली आहे. दरम्यान, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांची मदत घेतली मात्र अपेक्षित यश आले नाही. याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: 63 lakhs of crores of bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.