शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील ६० टक्के बलात्कार विवाहाच्या अमिषाने

By विजय मोरे | Updated: December 17, 2018 19:13 IST

नाशिक : विवाहाबाबत प्रत्येकाच्या तरुण-तरुणीच्या अपेक्षा वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येकाला आपला जीवनसाथी हा सुंदर व स्थिरस्थावरच असावा असेच वाटते़ मोबाईलवरील फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडीयामुळे तर अनोळखी व अपरिचित व्यक्तींबरोबर संवाद साधून त्याच्या आवडी-निवडी जाणून घेता येतात़ सोशल मीडीया वा ओळखीतील परिचितांकडून विश्वास निर्माण करून विवाहाचे अमिष दाखवित बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ नाशिक शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये सुमारे साठ टक्के बलात्काराचे गुन्हे हे विवाहाच्या अमिषाने झाल्याचे समोर आले आहे़

ठळक मुद्दे ४० गुन्ह्यांची उकल करण्यात शहर पोलिसांना यश

नाशिक : विवाहाबाबत प्रत्येकाच्या तरुण-तरुणीच्या अपेक्षा वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येकाला आपला जीवनसाथी हा सुंदर व स्थिरस्थावरच असावा असेच वाटते़ मोबाईलवरील फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडीयामुळे तर अनोळखी व अपरिचित व्यक्तींबरोबर संवाद साधून त्याच्या आवडी-निवडी जाणून घेता येतात़ सोशल मीडीया वा ओळखीतील परिचितांकडून विश्वास निर्माण करून विवाहाचे अमिष दाखवित बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ नाशिक शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये सुमारे साठ टक्के बलात्काराचे गुन्हे हे विवाहाच्या अमिषाने झाल्याचे समोर आले आहे़

शहर पोलीस आयुक्तालयातील तेरा पोलीस ठाणी व सायबर पोलीस ठाण्यात जानेवारी ते आॅक्टोबर २०१८ या कालावधीत बलात्काराचे ४२ गुन्हे दाखल असून त्यापैकी ४० गुन्ह्यांची उकल करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे़ पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांपैकी सुमारे ६० टक्के बलात्काराचे गुन्हे विवाहाचे अमिष दाखवून केल्याचे पोलिसांकडील आकडेवारीवरून समोर आले आहे़ विवाहाच्या अमिषास केवळ अविवाहित तरुणीच नव्हे तर विवाहित महिला व अल्पवयीन शाळकरी मुलीही बळी पडल्या असून त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या घटना घडल्या आहेत़

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गत तीन वर्षांत १०८ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत़ या गुन्ह्यांतील कारणांचा आढावा घेतला असता नातेसंबंध,ओळखीतील तरुण तसेच सोशल मीडीयाच्या माध्यमातून विशेषत: फेसबुक, इन्स्टाग्राम व विवाह जमविणारी संकेतस्थळे यावरून ओळख वाढवून प्रथमत: विश्वास निर्माण केला जातो़ यानंतर विवाहाचे अमिषाने तरुणींना भावनिक करून त्यानावाखाली बलात्कार केला जातो़ यावर कळस म्हणजे प्रेमसंबंधातून झालेल्या शरीरसंबंधांचे गुपचूप व्हिडीओ काढून ते सोशल मीडीयावर टाकून खंडणी उकळल्याचे प्रकारही घडले आहेत़

मूळात ‘विवाह’ हे व्यक्तिंमधील नाते संबध (नाते) निर्माण करणारे सामाजिक बंधन अथवा कायदेशीर करार असतो़ मात्र, सोशल मीडीयाच्या व्हर्च्युअल जगात वावरणारी तरुणाई विशेषत: तरुणी याकडे दुर्लक्ष करतात़ काही महिन्यांपुर्वीच ओळख झालेल्या व्यक्तीने दिलेल्या विवाहाच्या अमिषास भुलून आपले सर्वस्व बहाल करतात़ यानंतर काही दिवसांनी संबंधित अनोळखी तरुणाचा पुर्वीच विवाह झाल्याचे व आपली फसवणूक झाल्याचे समोर येते़ पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांमध्ये गतीमंद, अल्पवयीन व शाळकरी मुलींना विवाहाचे अमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या घटनांची संख्याही तुलनेने अधिक आहे़शहर पोलिसात दाखल बलात्काराचे गुन्हे-----------------------------------------------वर्षे                     गुन्हे             उघड-----------------------------------------------२०१८                 ४२             ४० (आक्टोबरपर्यंत)२०१७                ३६             ३६२०१६                ३०              ३०-----------------------------------------------तीन वर्षे            १०८            १०६ 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस