बंदुकीचा धाक दाखवत दरोड्यात कारसह ६० लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2022 15:37 IST2022-11-12T15:31:03+5:302022-11-12T15:37:06+5:30
दिंडोरी : नांदूर शिंगोटे येथील दरोड्याचा तपास लागला असतानाच दिंडोरीतालुक्यातील ढकांबे येथे रतन बोडके या शेतकऱ्याच्या घरी पाच ते ...

बंदुकीचा धाक दाखवत दरोड्यात कारसह ६० लाखाचा ऐवज लंपास
दिंडोरी : नांदूर शिंगोटे येथील दरोड्याचा तपास लागला असतानाच दिंडोरीतालुक्यातील ढकांबे येथे रतन बोडके या शेतकऱ्याच्या घरी पाच ते सहा दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकत पन्नास से साठ लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
बोडके यांच्या बंगल्यातून साधारणतः ६० ते ७० तोळे सोने तसेच रोकड चोरी गेल्याची माहिती मिळत आहे. सहा दरोडेखोरांनी शनिवारी (दि.१२) पहाटे दिड वाजेच्या सुमारास बंगल्यात प्रवेश करत त्यातील तीन जणांनी बंदुकीचा धाक दाखवत घरातील व्यक्तींना एक खोलीत कोंडून जबरी लूट केली.
तसेच जाताना कार तसेच सीसीटिव्हीची हार्ड डिस्क ही घेवून गेले. दिंडोरी पोलिसांना घटनेची खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपास सुरू केला आहे. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे .