पाडळी विद्यालयात १०१ महिलांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 17:46 IST2020-03-08T17:45:49+5:302020-03-08T17:46:20+5:30
सिन्नर : जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात १०१ कर्तृत्वान महिलांचा गौरव करण्यात आला. तर विद्यालयात प्राजक्ता शिंदे हिला एक दिवसाची मुख्याध्यापिका बनवून महिला सक्षमीकरणाचा संदेश समाजापर्यंत पोहचविण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

पाडळी विद्यालयात १०१ महिलांचा गौरव
मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. सरपंच अरूणा रेवगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास शोभा रेवगडे, अनिता रेवगडे, निर्मला रेवगडे, मीरा रेवगडे, विमल रेवगडे, शोभा शिंदे, शितल शिंदे, वर्षा शिंदे, सुमन शिंदे, शकुंतला माळी,ललिता जाधव, आम्रपाली आव्हाड , प्रतिभा शिरसाठ आदी उपस्थित होत्या. उपशिक्षिका एम. एम. शेख, सविता देशमुख, सी. बी. शिंदे यांनी महिलांचा गौरव केला. शेती, सहकार, नोकरदार, गृहिणी आदी क्षेत्रातील महिला प्रामणिकपणे त्यांची भूमिका पार पाडतात. त्यांचा गौरव होणे गरजेचे असल्याने हा उपक्रम राबविल्याचे देशमुख यांनी सांगितले. यात पाडळी व आशापूर येथील महिलांचा समावेश होता. एक दिवासाची मुख्याध्यापिका उपक्रमात शिंदे या विद्यार्थिनीने संपूर्ण दिवसभराचे कामकाज पाहिले. सविता देशमुख यांनी महिलांचे हक्क, कर्तव्य, महिला सक्षमीकरण, सबलीकरण यावर माहिती दिली. यावेळी बी.आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, टी.के.रेवगडे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, के. पी. साठे, ए. बी. थोरे आदींसह गावातील महिला उपस्थित होत्या.