नाशिकमध्ये आढळले ६ क्षयरोगी; मनपाची शोध मोहीम
By अमोल यादव | Updated: September 16, 2022 14:46 IST2022-09-16T14:45:05+5:302022-09-16T14:46:04+5:30
नाशिक महापालिकेतर्फे मंगळवार (दि. १३) पासून ही मोहिम राबवण्यात येत असून ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

नाशिकमध्ये आढळले ६ क्षयरोगी; मनपाची शोध मोहीम
नाशिक : महापालिकेतर्फे शहरात क्षयरोग व कृष्ठरोग शोध अभियान सुरू असून तीन दिवसात ५० हजार ६६ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यातील संशयितांची मनपाच्या रुग्णालयांमध्ये तपासणी केली असून ६ रुग्णांना क्षयरोग असल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मनपाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी दिली.
नाशिक महापालिकेतर्फे मंगळवार (दि. १३) पासून ही मोहिम राबवण्यात येत असून ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यासाठी १४६ पथकांची नियुक्त करण्यात आली आहे. हे पथके ४८ हजार ४३६ घरांना भेटी देऊन २ लाख ४२ हजार लोकसंख्येची तपासणी करणार आहेत.
दरम्यान, पहिल्या तीन दिवसात ५० हजाराहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. मोहिमेत रोगाची लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांची मनपाच्या रुग्णालयात तपासणी औषधोपचार सुरू करण्यात येत आहे.