दोन घरफ ोड्यांत ५७ हजारांची चोरी
By Admin | Updated: May 8, 2014 21:30 IST2014-05-08T20:53:49+5:302014-05-08T21:30:36+5:30
नाशिक : शहरात दोन ठिकाणी झालेल्या घरफ ोड्यांमध्ये ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरांनी चोरून नेला़

दोन घरफ ोड्यांत ५७ हजारांची चोरी
नाशिक : शहरात दोन ठिकाणी झालेल्या घरफ ोड्यांमध्ये ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरांनी चोरून नेला़
विसे चौक येथील रामतीर्थ सोसायटीतील रहिवासी प्राची राजाराम इंगळे यांच्या घरात बुधवारी पहाटे ५ ते ९ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला व लॅपटॉप, सोने तसेच चांदीच्या अंगठ्या असा सुमारे ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दुसर्या घटनेत सिडकोच्या विजय चौक येथील सुधीर केशव सराफ व त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेले असता १७ ते २८ एप्रिलदरम्यान चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला व लोखंडी कपाटातील सोने व चांदीचे २७ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले़ दोन्ही घटनांत मिळून अशी ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरांनी चोरून नेला़
शाळा, महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या असून, सुट्यांनिमित्त फि रण्यासाठी बाहेर जाणार्या कुटुंबावर नजर ठेवून चोरटे त्यांच्या अनुपस्थितीत घर साफ करत असल्याचे प्रकार शहरात वाढले असून, नागरिकांनी याची दहशत घेतली आहे़ घरफ ोडीच्या प्रकारांवर पोलिसांनी तत्काळ अंकुश आणण्याची मागणी नागरिक करीत आहेत़