डिक्की तोडून ५७ हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 23:54 IST2021-07-07T23:53:55+5:302021-07-07T23:54:42+5:30

लासलगाव : येथील लोटस हॉस्पिटलच्या समोर दुपारी दोन वाजेच्या दरम्यान दुचाकीस्वाराला दोन अनोळखी इसमांनी तुमचे पैसे पडले, असे सांगत दुचाकीच्या डिक्कीतून ५७ हजार रुपये लंपास केले.

57 thousand lamps by breaking the trunk | डिक्की तोडून ५७ हजार लंपास

डिक्की तोडून ५७ हजार लंपास

ठळक मुद्देदोघा भामट्यांनी दुचाकीची डिक्की तोडून ५७ हजार ८०० रुपये चोरून नेले.

लासलगाव : येथील लोटस हॉस्पिटलच्या समोर दुपारी दोन वाजेच्या दरम्यान दुचाकीस्वाराला दोन अनोळखी इसमांनी तुमचे पैसे पडले, असे सांगत दुचाकीच्या डिक्कीतून ५७ हजार रुपये लंपास केले.

गंगाधर लक्ष्मण पारखे (६०, रा. कानळद, ता. निफाड) हे मोटरसायकलने (एम एच ४१ आर २५९४) बुधवारी (दि.७) बँकेतून पैसे काढण्यासाठी लासलगावात पुतण्या महेद्र पारखेसमवेत आले होते. स्टेट बँकेतून ६५ हजार रुपये काढून गॅरेजवर जाऊन फिटरला कामाचे ७,२०० रुपये दिले व उर्वरित ५७,८०० रुपये पिशवीसह दुचाकीच्या डिक्कीत ठेवून दुपारी दोन वाजेच्या दरम्यान विंचूर मार्गे घरी जात असताना लोटस हॉस्पिटल जवळ येताच पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवरील दोन मुलांनी बाबा तुमचे पैसे रोडवर पडलेले आहे, असे सांगितल्याने दुचाकी रोडच्या बाजूला उभी केली. पैसे उचलत खिशात ठेवत असतानाच या दोघा भामट्यांनी दुचाकीची डिक्की तोडून ५७ हजार ८०० रुपये चोरून नेले. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, राजेंद्र अहिरे, पोलीस नाईक कैलास महाजन, प्रदीप आजगे हे करीत आहेत.

Web Title: 57 thousand lamps by breaking the trunk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.