सटाण्यात तरुणाला घातला आॅनलाईन ५५ हजाराला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 16:52 IST2020-07-26T16:52:00+5:302020-07-26T16:52:23+5:30
सटाणा : शहरातील एका फोटो स्टुडिओ चालकाला तब्बल ५५ हजार रु पयांचा गंडा लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित फोटोग्राफरने सटाणा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सटाण्यात तरुणाला घातला आॅनलाईन ५५ हजाराला गंडा
सटाणा : शहरातील एका फोटो स्टुडिओ चालकाला तब्बल ५५ हजार रु पयांचा गंडा लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित फोटोग्राफरने सटाणा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
शहरातील सुप्रभा फोटो स्टुडिओचे संचालक प्रवीण सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या सोमवारी (दि. २०) त्यांनी किरण विसपुते यास फोन पे वरून मोबाईल रीचार्जसाठी पाचशे रु पयांच्या ऐवजी नजरचुकीने पाच हजार रु पयांचे आॅनलाईन पेमेंट पाठविले. त्यामुळे उर्वरीत रक्कम परत मिळावी यासाठी सोनवणे यांनी कस्टमर केअरशी संपर्क साधला असता ब्रांच मॅनेजर राजेश कुमार यांच्याशी सदर प्रकार सांगितला. त्यांनी एटीएमचा सोळा अंकी क्र मांक, एटीएमची एक्स्पयारी डेट ही माहिती विचारून अॅनीडेस्क अॅप इंस्टॉल करताच पैसे परत मिळतील असे सांगितले. मात्र तसे केल्यानंतर आधी १५०० रु पये खात्यातून कट झाले आणि त्यानंतर सलग चार वेळेस ९९९९ रु पये आणि शेवटी ८ हजार रु पये असे एकूण ४९ हजार ४९६ रु पये त्यांच्या बँक खात्यातून कट झाले. यानंतर समोरील राजेश कुमार या व्यक्तीने त्याचा मोबाईल बंद केला. यामुळे तत्काळ बँक खाते असलेल्या कार्पोरेशन बँकेच्या शाखेत संपर्क साधून बँक प्रशासनाला माहिती दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तत्काळ पोलिसांकडे तक्र ार द्या...
आॅनलाईन व्यवहारांच्या फसवणुकीला सुशिक्षीत नागरिकही बळी पडतात, ही मोठी चिंतेची बाब आहे. आजच्या डिजीटल युगात नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. आपले वैयक्तिक बँक खाते, एटीएम क्र मांक, आधार, पॅनकार्ड तसेच महत्वाच्या कागदपत्रांची माहिती कोणालाही सांगू नका. असा प्रकार झाल्यास त्वरित बँक अधिकारी आणि पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन सटाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी केले आहे.