चांदवड : तालुक्यातील दुगाव गावात संत जनार्दन स्वामी कॉम्प्लेक्समधील तळमजल्यावरील गाळा नंबर ६ मधील अकुंश मुरलीधर खैरे यांच्या मोबाइल शॉपीचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी मोबाइलच्या बॅटऱ्या, हातातील घड्याळे, हेडफोन, सात हजार रुपये रोख, स्पीकर पॉवर बॅक असा एकूण ५३ हजार ३५० रुपयांचा माल चोरून नेला.याबाबत चांदवड पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, अधिकतपास हवालदार कैलास जगताप करीत आहेत.
दुगाव येथे ५३ हजारांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 01:33 IST