शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

सनातन धर्माच्या प्रसारासाठी नाशिकसह स्थापणार ५१ मठ

By admin | Updated: September 10, 2015 00:13 IST

संतसंमेलन : शंकराचार्य अधोक्षजानंद यांची घोषणा

पंचवटी : अध्यात्मिक संपदा कोणाला कमजोर करण्यासाठी, तसेच छळण्यासाठी नव्हे तर सर्वांना शक्तिशाली बनविण्यासाठी आहे. भारतीय संस्कृती टिकविण्याची जबाबदारी सर्वांचीच असून, सनातन धर्माच्या प्रचारासाठी नाशिकसह ५१ शंकराचार्य मठ स्थापन करणार आहे, असे प्रतिपादन जगद्गुरू शंकराचार्य अधोक्षजानंद महाराज यांनी केले.शंकराचार्य मठात धार्मिक आणि सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी संतसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री गेगांग अपांग, झेंडाबाबा, भागवताचार्य अनुरागकृष्णशास्त्री आदिंसह मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना शंकराचार्य अधोक्षजानंद यांनी पुढे असे सांगितले की, देशात अराजकता व भयावह परिस्थिती उदभवू नये यासाठी नागरिकांनी आपल्या कर्तव्याचे पालन करावे. सनातन धर्माचा प्रचार केल्यास भारतीय संस्कृती टिकून राहील आणि यासाठीच नाशिकमध्ये १ तर आसाम, अरुणाचल, मेघालय, मिझोराम या राज्यांच्या सीमारेषेवर १५, जम्मू-काश्मीरमध्ये १0 आणि उर्वरित पंजाब, गुजरात, राजस्थान व पाकिस्तानच्या सीमारेषेवर १६ व अन्य राज्य मिळून जवळपास ५१ शंकराचार्य मठाच्या शाखा स्थापन करून संस्कार निर्मितीसाठी शिक्षण, अध्यात्माच्या माध्यमातून नवीन पिढी घडविणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.या संतसंमेलनाला बिहार काँग्रेसचे माजी अध्यक्ष अनिलकुमार शर्मा, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, माजी नगरसेवक लक्ष्मण मंडाले, सरदारसिंग गुरुजी आदिंसह साधू-महंत व भाविक उपस्थित होते. (वार्ताहर)