नाशिक : नाशिक जिल्ह्याने गेल्या सप्टेंबर महिन्यात राष्टÑीय महालोकअदालतीमध्ये सुमारे २६ हजार दावे निकाली काढून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता, त्यानंतर पुन्हा तीन महिन्यांनी झालेल्या महालोकअदालतीत नाशिक राज्यात अव्वल राहिले असून, राज्यात दोन लाख १९५ प्रकरणे निकाली काढण्यात विविध जिल्ह्यांना यश आले; त्यापैकी नाशिक जिल्ह्यात एकूण सर्वाधिक एक लाख २७ हजार ५६३ प्रकरणांचा निपटारा झाला, तर विक्रमी शंभर कोटी ६८ हजार २५ रुपयांची तडजोड रकमेची वसुली करण्यात आल्याची माहिती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुर्यकांत शिंदे यांनी दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने शनिवारी (दि.९) आयोजित करण्यात आलेल्या राष्टÑीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये कामकाज नियोजनबद्ध व यशस्वीरीत्या पार पडले. राज्यभरात एकूण १० लाख ४३ हजार १६ दावे लोकअदालतीपुढे ठेवण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सूर्यकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये लोकअदालत घेण्यात आली. राज्यातील सर्वाधिक प्रकरणे जिल्ह्यात निकाली काढण्यात आली. लोकअदालतीमुळे पक्षकारांचा वेळ, पैसा अशा सर्वच बाबींची बचत होते. लोकअदालतीचे महत्त्व जनतेने लक्षात घेणे गरजेचे असून पुढील बॅँक प्रकरणांमध्ये सहा कोटींची वसुलीबँक वसुलीच्या विविध खटल्यांमध्ये एकूण १,१०७ खटले निकाली काढण्यात यश आले असून, ६ कोटी २० लाख एक हजार २३४ रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. एकूण दहा हजार २८१ खटले बॅँक वसुलीसंदर्भात दाखल झाले होते. महावितरण देयकांबाबत सुमारे ७६ हजार २०७ खटल्यांंपैकी १७ हजार ४७० दावे निकाली निघाली. यामध्ये ३ कोटी ९६ लाख २४ हजार ५०९ रुपयांची वसुली करण्यात आली.
राज्यातील एकूण खटल्यांचा ५० टक्के नाशकात निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:45 IST
नाशिक : नाशिक जिल्ह्याने गेल्या सप्टेंबर महिन्यात राष्टÑीय महालोकअदालतीमध्ये सुमारे २६ हजार दावे निकाली काढून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता, त्यानंतर पुन्हा तीन महिन्यांनी झालेल्या महालोकअदालतीत नाशिक राज्यात अव्वल राहिले असून, राज्यात दोन लाख १९५ प्रकरणे निकाली काढण्यात विविध जिल्ह्यांना यश आले; त्यापैकी नाशिक जिल्ह्यात एकूण सर्वाधिक एक लाख २७ हजार ५६३ प्रकरणांचा निपटारा झाला, तर विक्रमी शंभर कोटी ६८ हजार २५ रुपयांची तडजोड रकमेची वसुली करण्यात आल्याची माहिती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुर्यकांत शिंदे यांनी दिली.
राज्यातील एकूण खटल्यांचा ५० टक्के नाशकात निपटारा
ठळक मुद्देराज्यातील एकूण खटल्यांचा ५० टक्के नाशकात निपटारामहालोकअदालत : एक लाख २७ हजार ५६३ दावे निकाली