विकास आराखड्याचे ५ कोटी परत जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:50 IST2018-06-15T00:50:03+5:302018-06-15T00:50:03+5:30
मालेगाव : शहर विकासासाठी निधीची कमतरता असताना केवळ राजकीय वादामुळे सन २०१५ मधील ५ कोटींच्या शहर विकास आराखड्याचे (डीपीआर) विशेष अनुदान तांत्रिक अडचणींमुळे शासनाकडे परत जाणार आहे. तत्कालीन सत्तारूढ तिसरा महाज व विरोधक असलेल्या कॉँग्रेसच्या राजकीय लढाईमुळे हे अनुदान परत जाणार असल्याचे समोर आले आहे.

सध्या अमृत योजनेंतर्गत १४ उद्यानांची कामे मंजूर झाली आहेत. मात्र सदर कामे रखडली आहेत. ८ कामे कासव गतीने सुरू आहेत. यामुळे संतप्त झालेल्या मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी अमृत योजनेच्या उद्यान ठेकेदाराला अंतरिम नोटीस बजावली असून, ३० जूनपर्यंत ६ कामे पूर्ण करावीत तर उर्वरित कामे १० जुलै अखेर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. अमृत पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदारालाही समज देण्यात आली असल्याची माहिती मनपा आयुक्त धायगुडे यांनी दिली.
दरम्यान, २०१५ साली महापालिकेच्या सत्तारूढ तिसरा महाज व विरोध असलेले कॉँग्रेसच्या राजकारणामुळे ५ कोटीचे विशेष अनुदान परत जाणार आहे. केवळ ८ कोटींचा डीपीआर मंजूर झाला आहे.घरकुल योजनेच्या ११ हजार घरकुलांपैकी १४८८ घरे ३० जूनपर्यंत ताब्यात द्यावे, उर्वरित १४४० घरे ३१ जुलै तर १४८८ घरे ३१ आॅगस्ट अखेरपर्यंत ताब्यात देण्याच्या सूचना ठेकेदाराला करण्यात आल्या आहेत. ९ हजार ५०० घरे केव्हा देणार असे हमीपत्र ठेकेदाराकडून लिहून घेण्यात आले आहे, तर उड्डाणपुलाच्या ठेकेदाराला आठ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.