अडीच लाखांच्या मद्यासह ५ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 00:34 IST2021-05-15T00:34:23+5:302021-05-15T00:34:50+5:30
पोलीस पथकाने गुरुवारी (दि.१३) रात्री जुना आडगाव नाक्यावरील पंचवटी बस डेपोसमोर रात्री सापळा रचून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे देशी- विदेशी मद्य व एक मारुती ओमनी कार असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकणी पोलिसांनी बेकायदा मद्य विक्री करणाऱ्या ५ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

अडीच लाखांच्या मद्यासह ५ अटकेत
पंचवटी : शहरात लॉकडाऊन लागू असतानाही पंचवटीत सर्रासपणे देशी- विदेशी अवैध मद्य विक्री होत असल्याची माहिती पंचवटी पोलिसांना मिळताच पोलीस पथकाने गुरुवारी (दि.१३) रात्री जुना आडगाव नाक्यावरील पंचवटी बस डेपोसमोर रात्री सापळा रचून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे देशी- विदेशी मद्य व एक मारुती ओमनी कार असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकणी पोलिसांनी बेकायदा मद्य विक्री करणाऱ्या ५ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये संशयित मयूर साहेबराव बोधक, (मखमलाबाद), कपिल रोहिदास पगारे (अवधूतवाडी, फुलेनगर), दीपक बाळू पोद्दार (स्वामी नारायण मंदिर ट्रस्ट खोली), प्रीतम राजेंद्र चव्हाण (गंगापूर रोड), रोहन सुरेश शिंदेे (भद्रकाली) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून देशी दारूचे ४० बॉक्स, विदेशी दारूचे १४ बॉक्स ताब्यात घेण्यात आले.