४८० कोटी परत करा, तरच कर्मचाऱ्यांना वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:39 IST2020-08-14T00:37:59+5:302020-08-14T00:39:09+5:30
समाजकल्याण विभागाने अखर्चिक राहिलेली ४८० कोटी रुपयांची अखिर्चित रक्कम शासनाला परत केली नसल्याने राज्यातील समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन होऊ शकलले नाही. अखर्चित रक्कम शासन जमा करण्याबाबत कोषागार कार्यालयाने समाजल्याण विभागाला तंबी दिली आहे. रक्कम जमा केली नसल्याचा त्याचा फटका मात्र कर्मचाºयांना बसत आहे.

४८० कोटी परत करा, तरच कर्मचाऱ्यांना वेतन
नाशिक : समाजकल्याण विभागाने अखर्चिक राहिलेली ४८० कोटी रुपयांची अखिर्चित रक्कम शासनाला परत केली नसल्याने राज्यातील समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन होऊ शकलले नाही. अखर्चित रक्कम शासन जमा करण्याबाबत कोषागार कार्यालयाने समाजल्याण विभागाला तंबी दिली आहे. रक्कम जमा केली नसल्याचा त्याचा फटका मात्र कर्मचाºयांना बसत आहे.
समाजल्याण आयुक्तालय तवेच त्यांच्या अधिननस्त असलेलय क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मागासवर्गीय कल्याणाच्या विविध योजनांसाठी असलेली ४८०.३५ कोटींची रक्कम अखर्चित राहिलेली आहे. शासनाच्या आदेशानुसार अखर्चित रक्कम राज्य शासनाला परत करणे अनिवार्य आहे. असे असतांनाही समाजकल्याण विभागाने अजूनही सदर रक्कम परत केली नसल्याचे कर्मचाºयांचे वेतन मात्र अडकले आहे.
वेतन नसल्यामुळे समाजकल्याण कर्मचारी संघटनेने तत्काळ वेत मिळावे यासाठी सामाजिक न्याय विभाागाच्या प्रधान सचिवांकडे गाºहाणे मांडले आहे. कर्मचाºयांना वेतन नसल्यामुळे त्यांची आर्थिक अडचण होत आहेच शिवाय कोरोनाच्या काळात जोखीम पत्करून काम करावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाºयांच्या मानसिकेतवर देखील परिणाम होत असल्याचे निवेदन संघटनेने पाठविले अ ाहे. निवेदनावर अध्यक्ष शांताराम शिंदे, सचिव सुजित भांबुरे, कोषाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांच्या स्वाक्षरी आहेत.