्नराज्यातील ४५ उपासकांनी घेतली श्रामणेर दीक्षा
By Admin | Updated: May 14, 2014 01:09 IST2014-05-14T01:04:01+5:302014-05-14T01:09:14+5:30
त्रिरश्मी लेणी : बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध उप्रकम

्नराज्यातील ४५ उपासकांनी घेतली श्रामणेर दीक्षा
त्रिरश्मी लेणी : बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध उप्रकम
नाशिक : बुद्ध पौर्णिमेनिमित्त नालंदा एज्युकेशनल ॲण्ड सोशल ट्रस्टच्या वतीने आयोजित सहा दिवसांच्या श्रामणेर दीक्षा शिबिरात राज्यभरातील ४५ उपासकांनी सहभागी होत धम्म समजावून घेतला, तसेच स्वत:पासून बौद्ध धर्माचे आचरण करण्याची शपथ घेतली़
पांडवलेणीच्या पायथ्याला असलेल्या बुद्धविहारात सुरू असलेल्या या श्रामणेर शिबिराचा बुद्ध पौर्णिमेला समारोप होत आहे़ बुद्ध पौर्णिमेनिमित्त उद्या दिवसभर विविध कार्यक्रमांचे याठिकाणी आयोजन करण्यात आले आहे़
बुद्ध स्मारकात नालंदा एज्युकेशनल ॲण्ड सोशल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रामणेर दीक्षा शिबिरात नाशिकसह परभणी, धुळे, हिंगोली, औरंगाबाद तसाच विविध ठिकाणच्या ४५ बाल व तरुण उपासकांनी सहभागी होत धम्माचा अभ्यास केला़ त्यांना भन्ते धम्मदीप यांच्या मार्गदर्शनाखाली भन्ते आर्यनाग, भन्ते धम्मकीर्ती, भन्ते राहुल, भन्ते प्रज्ञाधोन यांनी धार्मिक विधीची तसेच बौद्ध धर्माची माहिती देत दीक्षा दिली़ यावेळी सेवक भास्कर जोशी, रावसाहेब रगडे, उत्तम रसाळ, धम्म जाधव, प्रवीण राऊत आदिंनी सहभाग नोंदविला़
बुद्ध पौर्णिमेनिमित्त पांडवेलणी येथील बुद्ध स्मारकात बुद्ध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे़ यामध्ये सकाळी ध्वजारोहण, ध्यान, मंगल मैत्री, बुद्धवंदना, परित्राण पाठ, दुपारी रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर, भिक्खू महासंघाला महासंघदान, धम्म बांधवांना भोजनदान, भिक्खू संघाची धम्म देसना, सायंकाळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, कवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानच्या वतीने बुद्ध पहाट कार्यक्रम सादर होणार आहे़
चौकट
काय आहे श्रामणेर दीक्षा?
भगवान बुद्धांनी बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पवित्र भिक्खू संघाची स्थापना केली होती. भगवान बुद्धांचा भिक्खू संघ म्हणजे शिस्तप्रिय समाज घडविणारा संघ. भिक्खू संघात प्रवेशासाठी कुटुंबीयांची परवानगी घेणे आवश्यक असते. केशवपन करून त्रिशरण, पंचशील ग्रहण केल्यानंतर आणि भिक्खू संघाच्या सर्व नियम, अटींचे पालन करणार्यांनाच भिक्खू संघात प्रवेश देण्यात येतो. पाच किंवा दहा दिवसांसाठीही श्रामणेर दीक्षा घेण्याची तरतूद बौद्ध धर्मात आहे. आयुष्याला चांगले वळण, आचरणात सुधार घडविण्यासाठी आणि बौद्ध धर्माविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी अनेकजण ही श्रामणेर दीक्षा घेतात.
फ ोटो क्रमांक - 13पीएचएमए 65
फ ोटो ओळी - पांडवलेणी पायथ्याजवळील बुद्ध स्मारकात श्रामणेर दीक्षेसाठी जाताना सहभागी उपासक.