४५ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:12 IST2018-10-13T23:23:19+5:302018-10-14T00:12:42+5:30

महापालिकेच्या पंचवटी आरोग्य विभागाच्या वतीने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील काही दुकान विक्रेते, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याची माहिती मिळताच पथकाने धाव घेत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशवी विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून ४५ किलो पिशव्या जप्त करून त्यांच्याकडून १५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

45 kg plastic bags seized | ४५ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त

४५ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त

पंचवटी : महापालिकेच्या पंचवटी आरोग्य विभागाच्या वतीने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील काही दुकान विक्रेते, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याची माहिती मिळताच पथकाने धाव घेत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशवी विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून ४५ किलो पिशव्या जप्त करून त्यांच्याकडून १५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
प्लॅस्टिक वापर करणाºया व्यावसायिक तसेच नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची तरतूदही कायद्यात असून, त्याचाच आधार घेत गुरुवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पहाटे ४ ते ६ यावेळेत मनपा अधिकारी व कर्मचाºयांनी प्लॅस्टिकविरोधी मोहीम राबविली. यावेळी तब्बल ४५ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. उपायुक्त डॉ. सचिन हिरे, स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, दीपक चव्हाण, किरण मारू, डी. बी. माळेकर, उदय वसावे, संजय तिडके, राकेश साबळे, मंगेश बागुल, संजय मकवाना, संजय जाधव आदींनी कारवाई मोहीम राबविली.

Web Title: 45 kg plastic bags seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.