शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
4
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
5
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
6
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
7
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
8
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
9
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
10
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
11
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
12
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
13
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
14
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
15
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
16
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
17
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
18
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
19
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
20
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान

लॉकडाऊनच्या काळातही सिव्हीलमध्ये ४४५७ शस्त्रक्रिया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 12:13 AM

जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ज्यावेळी कोणत्याच शस्त्रक्रिया होत नव्हत्या, त्यावेळी नाशिक जिल्हा रुग्णालयात तब्बल ४,४५७ शस्त्रक्रिया पार पाडून जनसामान्यांना जीवनदान देण्यात आले आहे. या शस्त्रक्रियांमध्ये लहान, मोठ्या, गंभीर शस्त्रक्रियांसह सीझर पद्धतीने केलेल्या बाळंतपणांचादेखील समावेश आहे.

ठळक मुद्देसेवा परमोधर्म : कोरोना काळातही लहान-मोठ्या स्वरूपाच्या आॅपरेशन्सची कर्तव्यपूर्ती

नाशिक : जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ज्यावेळी कोणत्याच शस्त्रक्रिया होत नव्हत्या, त्यावेळी नाशिक जिल्हा रुग्णालयाततब्बल ४,४५७ शस्त्रक्रिया पार पाडून जनसामान्यांना जीवनदान देण्यात आले आहे. या शस्त्रक्रियांमध्ये लहान, मोठ्या, गंभीर शस्त्रक्रियांसह सीझर पद्धतीने केलेल्या बाळंतपणांचादेखील समावेश आहे.मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नाशिकमध्ये सर्वत्र लॉकडाऊन झाल्यापासून खासगी रुग्णालयांमधील शस्त्रक्रिया ठप्प झाल्या होत्या. केवळ काही मोजक्याच खासगी रुग्णालयांत तातडीच्या शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. खासगी रुग्णालये एकतर शस्त्रक्रिया पुढे ढकलत होते किंवा त्याबाबत काहीच प्रतिसाद देत नव्हते. अशा परिस्थितीत जिल्हा शासकीय रुग्णालयच कामाला आले.मार्च महिन्यात जिल्हा रुग्णालयात मोठ्या ३७७, तर लहान एक हजार २३९ शस्त्रक्रिया,४३२ सामान्य तर २४९ सिझर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर एप्रिल महिन्यात कडकडीत लॉकडाऊन पाळला जात असतानाच्या काळातही तातडीच्या ७८ मोठ्या, ४९५ छोट्या, २२७ सामान्य, तर १८३ प्रसूती सिझरने करण्यात आल्या होत्या.त्यानंतर खासगीमध्ये पूर्णपणे ठप्प असतानाच्या मे महिन्यात ६९ मोठ्या, ६०४ छोट्या, २८१ सामान्य आणि १५३ सिझर करण्यात आल्या. जून महिन्यातही तातडीच्या, लहान-मोठ्या शस्त्रक्रियांचा क्रम अव्याहतपणे सुरूच आहे.जिल्हा रुग्णालयातील ४५ वैद्यकीय अधिकारी आणि १२० परिचारिका आणि अन्य सहायक कर्मचाऱ्यांचे त्यासाठी योगदान मिळत आहे. या शस्त्रक्रिया करताना सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी पूर्ण खबरदारी बाळगून शस्त्रक्रिया पार पाडत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकhospitalहॉस्पिटल