शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

नाशिकच्या उच्चभ्रू परिसरात नाकाबंदीदरम्यान ४२३ बेशिस्त चालकांकडून एक लाखाचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 9:43 PM

कॉलेजरोड, शरणपूररोड, येवलेकर मळा, विसेमळा, गंगापूररोड, जेहान सर्कल आदी परिसरात सोनसाखळी चोरी, दुुचाकीचोरी, कारफोडीसारख्या वाढत्या गुन्हेगारी घटनांसोबत बेशिस्त वाहनचालकांचा उपद्रवही वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.

ठळक मुद्दे ४२३ बेशिस्त वाहनचालकांकडून यावेळी १ लाख २३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल सोनसाखळी चोरट्यांसह एकही संशयित पोलिसांच्या हाती लागला नाही नाकाबंदीच्या सापळ्यात चोरटे अडकले नाही

नाशिक : शरणपूररोड, कॉलेजरोड व गंगापूररोड परिसर हा उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखला जातो. या भागात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहर पोलिसांनी विशेष नाकाबंदी मोहीम सोमवारी (दि.११) राबविली. दरम्यान, ४२३ बेशिस्त वाहनचालकांकडून यावेळी १ लाख २३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.कॉलेजरोड, शरणपूररोड, येवलेकर मळा, विसेमळा, गंगापूररोड, जेहान सर्कल आदी परिसरात सोनसाखळी चोरी, दुुचाकीचोरी, कारफोडीसारख्या वाढत्या गुन्हेगारी घटनांसोबत बेशिस्त वाहनचालकांचा उपद्रवही वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. यााबबत वारंवार पोलिस आयुक्तांकडे प्राप्त होणा-या तक्रारीनुसार पोलीस प्रशासनाने या भागात सोमवारी विशेष नाकाबंदी मोहीम आखली. या मोहिमेदरम्यान बेशिस्त वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. सुमारे ४२३ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या नाकाबंदीदरम्यान मात्र सोनसाखळी चोरट्यांसह अन्य गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले एकही संशयित पोलिसांच्या हाती लागला नाही. विशेष म्हणजे रविवारी रात्री गंगापूररोड परिसरात एका लॉन्सच्या बाहेर दोन कारच्या काच फोडून चोरट्यांनी तब्बल दोन लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेचा छडा लावण्यासाठी मोहीम राबविल्याची चर्चा होती; मात्र नाकाबंदीच्या सापळ्यात चोरटे अडकले नाही. या नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी विविध पॉइंटवरून तब्बल ७८ वाहने जमा केली. नाकाबंदी मोहिमेत वाहनाची कागदपत्रे जवळ न बाळगणे, वीमा न उतरविणे, हेल्मेट परिधान न करणे, परवाना सोबत न ठेवणे अथवा विना परवाना वाहन चालविणे, वेग मर्यादेचे पालन न करणे, सीटबेल्टचा वापर टाळणे आदी प्रकारानुसार मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आल्याची माहिती उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.

नाकाबंदीवर ‘नजर’पॉइंट गुन्हे दंडजेहान सर्कल - ७७ १५,४००भोसला चौक - ३१ ८३००कॅनडा कॉर्नर - ६१ १६०००होलाराम कॉलनी चौक- १६० ७५,५००टिळकवाडी सिग्नल - २० ४००नागरिकांना दंड; ‘खाकी’वर मेहेरनजरमोटार वाहन कायद्यान्वये कोणताही व्यक्ती वाहन चालविताना नियमांचे भंग करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे; मात्र ही जबाबदारी पार पाडणा-या या प्रशासनाच्या कर्मचाºयांकडून जेव्हा वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केले जाते तेव्हा...? कारवाई कोण करणार? किंवा त्यांना अडविण्याचे धाडस कोण दाखविणार? असा प्रश्न यावेळी मोहिमेदरम्यान नागरिकांनी उपस्थित केला. कारण बहुतांश पॉइंटवर नाकाबंदीच्या वेळी पोलीस कर्मचाºयांवर मेहेरनजर दाखविली गेली.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस