जिल्ह्यात ४१२ रुग्णांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 00:58 IST2020-08-23T00:58:06+5:302020-08-23T00:58:27+5:30
जिल्ह्यात शनिवारी (दि. २२) एकूण ४१२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. जिल्ह्यात एकूण ९१२ नवे रु ग्ण आढळून आले.

जिल्ह्यात ४१२ रुग्णांनी केली कोरोनावर मात
नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (दि. २२) एकूण ४१२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. जिल्ह्यात एकूण ९१२ नवे रु ग्ण आढळून आले. यामुळे आता जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या २९ हजार ३३५ इतकी झाली आहे. दिवसभरात उपचारार्थ दाखल १० रुग्ण दगावले. यामुळे मृतांचा एकूण आकडा आता ७६१ वर पोहोचला. शनिवारी नाशिक शहरात ६२९ रुग्ण आढळून आले. एका दिवसात १३६ रुग्णांची वाढ झाली. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.