जिल्ह्यात ४१० कोरोनाबाधित बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 00:59 IST2020-07-31T23:51:45+5:302020-08-01T00:59:34+5:30
नाशिक जिल्ह्यातील ४१० बाधित शुक्रवारी कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत एकूण ११ हजार १२७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात २ हजार ७९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नवीन ६५७ नवीन बाधित रुग्ण आढळले असून, तिघांचा गरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ४९९वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात ४१० कोरोनाबाधित बरे
नाशिक : जिल्ह्यातील ४१० बाधित शुक्रवारी कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत एकूण ११ हजार १२७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात २ हजार ७९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नवीन ६५७ नवीन बाधित रुग्ण आढळले असून, तिघांचा गरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ४९९वर पोहोचली आहे.
बाधितांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक १ हजार ८२८ रुग्ण बाधित आहेत. ग्रामीणमध्ये नाशिक ८६४, मालेगाव ग्रामीण २९ अशा ८२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी महानगरात १, इगतपुरी व भगूरला प्रत्येकी एक रुग्ण कोरोनाने दगावल्यामुळे मृतांच्या संख्येत ३ने भर पडली आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या ४९९वर पोहोचली आहे. जिल्ह्णात आतापर्यंत झालेल्या एकूण ४९९ मृत्यूंपैकी नाशिक ग्रामीणला ११८, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २७६, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून ८५ व जिल्हाबाहेरील २० रु ग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रु ग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.